Thursday, September 19, 2024
Homeपुणेतळेगाववन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे विलास गायकवाड यांच्या प्रसंगावधानाने बचावले महिलेचे प्राण..

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे विलास गायकवाड यांच्या प्रसंगावधानाने बचावले महिलेचे प्राण..

तळेगाव (प्रतिनिधी): सोमाटणे फाटा येथील चौराई नगर येथील एका गरीब भाडेकरू यांच्या घरातील विषारी नाग या सापाला पकडण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना यश आले. विलास गायकवाड यांनी मध्य रात्री 2:30 च्या सुमारास कुठलाही विचार न करता हा साप पकडून सुखरूप वन विभागाच्या जागेत सोडून दिला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना आज रात्री 2:20 ला फोन आला की चौराई नगर येथील मुरहे यांच्या भाडेकरू च्या रूम मध्ये बेड वर झोपलेल्या महिलेच्या अंगावरून साप गेला आहे. ते लगेच तिथे जाऊन पोहचले तर तो नाग होता. सुदैवाने त्या महिलेला दंश केला नाही.
सदर महिला ही बेडवर झोपलेली असताना त्यांना हाताला मऊ काहीतरी लागल्याची चाहुल झाल्याने त्यांनी त्यांच्या पती ला उठवले व घर मालकाला सांगितले. त्यांनी कुठलाही विलंब न लावता त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना फोन केला. त्यांनी लगेच त्या ठीकाणी जावून तो विषारी नाग पकडला आणि वन विभागाच्या जागेत सोडुन दिला.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांच्या या धाडसने अथवा प्रसंगावधानाने खरं तर त्या गरीब महिलेचे प्राण वाचले आहेत.वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page