Sunday, September 8, 2024
Homeपुणेतळेगाववन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना धमक्या..

वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना धमक्या..

वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना दोन वेळा फोन करुन धमक्या..

तळेगाव दाभाडे: वन्यजीव रक्षक संस्था मावळच्या सामाजिक कामाची सर्वत्र प्रशंसा होत असताना, संस्थापक निलेश गराडे यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आल्याची घटना घडली आहे. पाण्यात बुडालेल्या मुलाला उशिरा काढल्याबद्दल आणि सोशल मीडियावर बातमी पोस्ट केल्यामुळे या धमक्या आल्याचे समजते.
गराडे यांना धमकी देताना फोन करणाऱ्यांनी आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे नाव घेत धमकी दिली की, “त्यांना सांगून तुझ्याकडे बघतो, तू कसा मावळमध्ये काम करतोस? तुझे सगळे काम लगेच बंद पाडतो. तू कुठे राहतो, लगेच सांग, मी तुझ्याकडे बघतो.” अशी धमकी दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत येत होती.
निलेश गराडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page