मुळशी :प्रतिनिधी वन परीक्षेत्र अधिकारी पौड.मा.श्री संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली वन परिमंडळ आंबवणे आयोजित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय अंबावणे येथे सर्व विद्यार्थ्यांसाठी “वन्य जीव सप्ताह “निमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.वन विभागाच्या वतीने संजय अहिरराव,योगेश जाधव,सोमनाथ केंद्रे मान्यवर उपस्थित होते.
तसेच ऐब्ये व्हॅली चे डॉ. राजेश चव्हाण, सर्प मित्र दुर्वेश साठे तुषार केंडे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उल्हास मानकर, शिक्षक पालक संघांचे अध्यक्ष योगेश वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी दुर्वेश व तुषार या सर्प मित्रानी सापांच्या प्रजाती विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन विषारी व बिनविषारी साप कोणते व सर्प दंश नंतर घ्यावयाची काळजी समाज – गैरसमज या विषयी उत्तम माहिती दिली.मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वनविभाग यांच्या वतीने वाटप केले. या स्पर्धेत इयत्ता 8 वी- प्रथम क्र.वेदांत साठे द्वितीय क्र. आदित्य शिंदे तुतीय क्र. सक्षम वाळंज 9 वी -प्रथम क्र. रघुवीर दळवी द्वितीय क्र.आर्या मेंगडे तृतीय क्र. अनुष्का सुतार 10 वी- प्रथम क्र. चैतन्य वाळंज द्वितीय क्र.वैष्णवी थोरवे तृतीय क्र.साक्षी हुंडारे या सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आली. विद्यालयातील शिक्षकांनी स्पर्धेचे पर्यवेक्षण केले. संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले.