Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळावरसोली टोल नाका येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा…

वरसोली टोल नाका येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा…

लोणावळा : भारत स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्षानिमित्त वरसोली टोल नाका येथे (आय आर बी ) कंपनी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने टोल नाका कार्यालय येथे झेंडा वंदन उत्सहात संपन्न झाले.
यावेळी वरसोली टोल नाका (आय आर बी ) व्यवस्थापक संतोष साळुंके, विभाग व्यवस्थापक परतडे साहेब यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज पूजन करून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज फडकवून मान वंदना देण्यात आली.
यावेळी उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस नाईक विजय मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गवळी,आय आर बी व्यवस्थापक संतोष साळुंके,विभाग व्यवस्थापक परतडे साहेब, विजय हुंडारे, नितीन पडवळ, सचिन कोंडभर, सुनील येवले, विशाल पडवळ, निलेश भानुसघरे, ओंकार शिंगरे यांसह सर्व टोल नाका अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page