लोणावळा दि.21: मुंबई पुणे महामार्गावर वरसोली टोल नाका येथे कंटेनर व दुचाकीचा अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू तर पंधरा वर्षीय मुलगी बचावली.( दुचाकी क्र. MH12 JD926), (कंटेनर क्र. RJ04GB7001)या दोन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे.
त्यामध्ये दुचाकीस्वार रामकेवल पुर्मी ( वारंगवाडी, मावळ ), त्याचा मुलगा धिरज रामकेवल पुर्मी ( वय 13 वर्ष, वारंगवाडी, मावळ ) हे दोघे अपघातात जबर मार लागल्याने यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पंधरा वर्षीय मुलगी अपघातातून बचावली असल्याची घटना आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.