Sunday, June 1, 2025
Homeपुणेलोणावळावाकसई ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी शाम विकारी बीनविरोध…

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी शाम विकारी बीनविरोध…

कार्ला : वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्याम खंडू विकारी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. शुक्रवार दि. 21 मार्च रोजी वाकसई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सदरची निवड प्रक्रिया पार पडली. वाकसई ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच मारुती भरत येवले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सदरची निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती.
विहित कालावधीमध्ये उपसरपंच या पदासाठी श्याम खंडू विकारी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी लोकनियुक्त सरपंच सोनाली मनोज जगताप यांनी शाम विकारी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड होत असल्याचे जाहीर केले. जगताप यांना सहाय्यक म्हणून ग्रामसचिव / ग्रामविकास अधिकारी श्री. गुडसुरकर यांनी काम पाहिले.

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत येवले, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मारुती देशमुख, कार्ला गावचे उपसरपंच किरण हुलावळे यांच्यासह तानाजी पडवळ, सुरेश कडू, संतोष राऊत, अमोल केदारी, मनोज जगताप, सदाशिव आहेर, खंडू केदारी, दीपक काशीकर, गणपत विकारी, वसंत विकारी, खंडू येवले, धोंडू येवले, हनुमंत आहेर, महेंद्र शिंदे, सूर्यकांत शेलार, ग्रामपंचायत सदस्य मारुती भरत येवले, भारत देसाई, जयश्री काशीकर, रूपाली शेलार, गणेश आहेर, मंगल ढाकोळ, सोनाली इंगुळकर, निलेश येवले, किरण येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page