Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवायरमन भरत शेंगारपल्लु यांचा आदर्श जनसेवक सन्मानपत्र देऊन केला सत्कार..

वायरमन भरत शेंगारपल्लु यांचा आदर्श जनसेवक सन्मानपत्र देऊन केला सत्कार..

वायरमन भरत शेंगारपल्लु यांचा आदर्श जनसेवक सन्मानपत्र देऊन केला सत्कार श्री.डी .बी.पाटील संस्थेचा स्तुत्य उपक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
पेन तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या महाल मिऱ्या डोंगर पठारावर महावितरण विभागाचे कर्मचारी वायरमन भरत पांडुरंग शेंगारपल्लू यांची बदली झाल्याने श्री. डी .बी.पाटील सामाजिक विकास संस्थेच्या वतीने त्यांचा आदर्श जनसेवक म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील महाल मिऱ्या ग्रामपंचायत हद्दीत महाल मिऱ्या डोंगर हे गावात अतिशय दुर्गम भागांत असून या गावात प्रामुख्याने आदिवासी, धनगर,व ठाकूर समाजाची लोकवस्ती जास्त आहे, या परिसरात महावितरण विभागाचे कर्मचारी (वायरमन ) म्हणून भरत शिंगारपल्लु यांनी गेल्या तीन वर्षांपासून या गावाची सेवा केली आहे या गावात कधीही रात्री अपरात्री तांत्रिक बिघाड झाल्यास शिंगारपल्लू हे तात्काळ येऊन येऊन गावात उद्भवनारी समस्या लगेच सोडवत असत,त्यांच्या याच स्वभावाने आणि आपल्या लोकांसाठी काम करण्याची असलेली तळमळ पाहून शिंगारपल्लू यांनी अखेर माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
अखेर त्यांची या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे यांनी गावासाठी निस्वार्थी पणाने केलेल्या कामाची दखल श्री. डी. बी. पाटील सामाजिक विकास संस्थेने घेतली असून त्यांचा आज आदर्श जनसेवक सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करून त्यांना निरोप समारंभ करण्यात आला, त्यांचा सत्कार जिल्हा परिषद चे माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री.डी.बी.पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डी. बी .पाटील साहेब, शेकाप चिटणीस दिनेशभाई खैरे, कामार्ली गण युवा प्रमुख आदेशभाई पाटील, महाल मिऱ्या डोंगर ग्रामपंचायतचे सरपंच जनार्दन भस्मा, श्री. डी.बी.पाटील सामाजिक विकास संस्था पेण रायगड चे अध्यक्ष श्री. विजयभाऊ उघडे, कार्याध्यक्ष श्री.संजय तिवले, याआदींसह महाल मिऱ्या डोंगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया-
गेल्या तीन वर्षांपासून महावितरण विभागाचे कर्मचारी म्हणून श्री. भरत शिंगारपल्लू यांनी अतिशय प्रामाणिक काम केले असून ग्रामस्थांना गावात येणाऱ्या अडचणी ते तात्काळ सोडवत असत , त्यांची आता दुसऱ्या भागात बदली झाल्याने त्यांच्या याच कामाची पोच पावती म्हणून आज आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा आदर्श जनसेवक सन्मानपत्र देऊन त्यांचा निरोप समारंभ साजरा केला.
श्री. विजयभाऊ उघडे..
अध्यक्ष- श्री.डी.बी.पाटील सामाजिक विकास संस्था पेण रायगड,
- Advertisment -

You cannot copy content of this page