Sunday, September 8, 2024
Homeपुणेलोणावळावाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान..

वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान..

लोणावळा (प्रतिनिधी):वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.मुक्ता फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन निमित्त देशभरातील समाजशील शिक्षक / शिक्षिका यांना पहिले शिक्षक गणुजी शिवाजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक 2023 व पहिल्या शिक्षिका फतिमा शेख राष्ट्रीय आदर्श शिक्षिका 2023 यांच्या नावे दर वर्षी पुरस्कार दिला जातो.
या वर्षी सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी जि. पुणे येथील मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे “राष्ट्रीय आदर्श शिक्षक”पुरस्कार कोल्हापूर येथील राजश्री शाहू स्मारक भवन येथे जेष्ठ नेते डी.जी. भास्कर, लेखिका छाया पाटील,व्याख्याते प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र सावंत,मुक्ता फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. अमोल महापुरे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, मानाचा फेटा,शाल आणि पुस्तकं असा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी कोराईगड शिक्षण संस्था अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज व संचालक शिक्षक कर्मचारी आंबवणेकर ग्रामस्थ पालक, मित्र परिवार यांनी देवरे सर यांचे अभिनंदन केले.तर पुरस्कार स्वीकारताना देवरे यांच्या पत्नी शालिनी देवरे व मुलगा श्लोक देवरे हे देखील उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page