Thursday, November 21, 2024
Homeपुणेमुळशीवाळंज विद्यालयात झाडांना राख्या बांधून मुलींनी केले रक्षाबंधन..

वाळंज विद्यालयात झाडांना राख्या बांधून मुलींनी केले रक्षाबंधन..

आंबवणे :- आंबवणे येथे वाळंज विद्यालयातील विद्यार्थिनींनी झाडाला राख्या बांधून साजरा केले अनोखे रक्षाबंधन. अनेक वेळा विषयाच्या अध्यापनात व शिक्षकांच्या शिकवण्यात आज वृक्ष लागवड व संवर्धन किती गरजेचे आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्याध्यापक श्री. देवरे म्हणाले की,कोविड काळात व अपुऱ्या व अनियमित पावसाच्या काळात मानवाच्या दैनंदिन जीवनात वृक्षा चे महत्व खूप आहे,वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्ष तोड,उष्णता वाढणे,पाऊस कमी होणे,भुजल साठा कमी होणे, इत्यादी समस्या निर्माण होतात. या सर्वावर झाडेच आपले संरक्षण करतात. व पर्यावरणाचे समतोल साधत असतात.त्यामुळे आपल्या परिसरसतील झाडे लागवड करणे, जगवणे काळजी घेणे, अशी कामे आपण केली पाहिजेत.
वृक्ष हा मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे त्यांचे सवर्धन व संगोपन व्हावे म्हणून झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करावा. असे मत कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक मा नंदकुमार वाळंज असे मत मांडले.ते म्हणाले या सणाच्या निमित्त बहीण – भावाच्या सारखेच अतूट रक्षणाचे नाते तयार होईल.
पुढील काळात झाडाबरोबर रक्षाबंधन करणाऱ्या मुली त्याच झाडाचे संवर्धन करतील.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आवडीने सहभाग घेतला. या कामात सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page