आंबवणे : “आयुष्यात ध्येय असणे गरजेचे आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी मेहनत घेतल्यास नक्कीच यश मिळते,” असे प्रतिपादन कॅनरी रिसॉर्ट आंबवणेचे चेअरमन मा. श्री. मिलिंद दादा वाळंज यांनी केले.
सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक अभ्यास करून भविष्यात आवश्यक तेव्हा मार्गदर्शनासाठी मदत मागावी, मी सदैव तयार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले, तर उपस्थित मान्यवर व शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ यशवंत माताळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण दळवी, आंबवणे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश मेंगडे, ग्रामपंचायत सदस्या मेघाताई नेवासाकर, अक्षराताई दळवी, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष योगेशभाऊ वाळंज, मनोज जंगम, प्रविण माताळे, माता-पालक संघाच्या अध्यक्षा मंदाताई वाळंज, विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ शाळेला फोटो प्रतिमा व दोन गॅस शेगड्या भेट दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. तसेच, सुरेश दादा कालेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना कंपास भेट दिली.
कार्यक्रमात संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर, मंदा दळवी, अरुणा दळवी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी प्रणव मोढवे यांनी प्रास्ताविक, तर साईराज राऊत यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी ‘कभी खुशी कभी गम’ या भावनिक वातावरणात शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.