Friday, July 4, 2025
Homeपुणेलोणावळाविद्या प्रसारिणी सभा नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गोवर्धन शिंगरे (बाबा )...

विद्या प्रसारिणी सभा नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गोवर्धन शिंगरे (बाबा ) यांचे निधन…

लोणावळा (प्रतिनिधी):विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गोवर्धनजी शिंगरे सर उर्फ बाबा यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुखद निधन झाले आहे.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सायंकाळी 6:30 वाजता भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे 5 या ठिकाणी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
बाबा यांनी मागील अनेक वर्ष व्हिपीएस शाळा, महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज यांचे कामकाज सांभाळले व वाढवले. नुकतेच वाकसई येथे फार्मसी कॉलेजची मान्यता मिळवून घेत शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. लोणावळा शहरातील व्हिपीएस शाळेत अनेक विभाग व ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक शाखा सुरु केल्या. त्यांच्या निधनाने विद्या प्रसारणी सभेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आज त्यांचा अंत्यसंस्कार पुण्यात करण्यात येणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page