Wednesday, July 23, 2025
Homeपुणेलोणावळाविद्या प्रसारिणी सभेच्या व्ही पी एस प्राथमिक विद्यालयात "कब बुलबुल" दिक्षाविधी उपक्रम...

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही पी एस प्राथमिक विद्यालयात “कब बुलबुल” दिक्षाविधी उपक्रम थाटात संपन्न…

लोणावळा:विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस. प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत दि.10 रोजी कब बुलबुल दिक्षाविधी उपक्रम थाटात पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.पी.एस.हायस्कूल गाईड कॅप्टन वैशाली तारू आणि स्काऊट लीडर संजय पालवे उपस्थित होते. स्काउट्स आणि गाईड्सचे संस्थापक लॉर्ड बॅडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाह डॉ.सतीश भा. गवळी आणि सहकार्यवाह विजय भुरके यांनी सर्व विद्यार्थ्याना आणि कब बुलबुल दिक्षाविधी उपक्रमासाठी तयारी करणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
कब बुलबुल विद्यार्थ्यांनी प्रार्थना, गाणी, ध्येय, संदेश याचे शिस्तीत सादरीकरण केले.इयत्ता दुसरी ते चौथी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कब बुलबुल विद्यार्थ्यांना शपथ दिली.यावेळी संजय पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्काऊट गाईड चळवळीचा विस्तार तसेच चळवळीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये होणाऱ्या बदलाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक संजय भालचिम, प्रकाश पाटील, हनुमंत शिंदे, महादेव शिरसाट, बापूराव भोसले, अमित रसाळ, शिक्षिका मनिषा जरग, सुनिता वरे, आशा खामकर, संगिता पाटील, स्वप्नाराणी भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी भिवाजी गायखे, जयश्री बागलकोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन महादेव शिरसाट यांनी केले तर आभार संजय भालचिम यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page