![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
कार्ला (प्रतिनिधी): शिवसेना परिवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व कुटुंबियांच्या श्रध्दास्थानी असलेल्या श्री . एकविरा देवीच्या दर्शनाने आज मनाला वेगळेच समाधान लाभले . एकविरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात लवकरच एक बैठक घेऊ . या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल , असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले .
शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित बये दार उघड मोहीम आज पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनाने समाप्त झाली . त्यावेळी त्या बोलत होत्या . त्या म्हणाल्या , एकविरा देवीच्या मंदिरातील कळस चोरी झाल्याच्या प्रश्नावर मी पाठपुरावा केला होता . पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे . याबाबत मा . उच्च न्यायालयाने आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने योग्य ती कार्यवाही होण्यासाठी लक्ष घालावे , अशी विनंती यावेळी त्यांनी केली .
तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्तरावर या परिसरातील जमिनींचा ताबा घेतल्याचे प्रश्न प्रलंबित आहे . यावर लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळ तालुक्यात अनेकांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाटक केले . आज मात्र त्यांची अवस्था ‘ खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले … ‘ अशी झाली आहे . मावळ वासियांच्या भावनांचा विचार न करता ते आज शिवसेनेची मूळ विचारधारा सोडून गेले आहेत . मात्र , आपण सर्व शिवसैनिक भक्कम असून यामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे यावेळी त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे , युवासेना पदाधिकारी शीतल शेठ , स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी , स्थानिक शिवसेना पदाधिकारी मच्छिंद्र खराडे , सुरेश गायकवाड , अनिता गोणते , शैला खंडागळे , वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर , पुणे महिला आघाडीच्या कल्पना थोरवे , अश्विनी शिंदे , अनिता परदेशी , ज्योती चांदेरे , अमृत पठारे , स्वाती रणपिसे , सुनीता रानवडे , रुपाली सुतार , पिंपरी चिंचवड येथील वैशाली मराठे , अनिता तुतारे , रोशनी जगताप , ज्योती भालके , वंदना वाल्हेकर , कामिनी मिश्रा , सुवर्णा मगर , प्रतीक्षा घुले , डॉ . वैशाली कुलथे , मुळशी तालुक्यातील सुरेखा तोंडे सुनिता तोंडे अपेक्षा तोंडे , सविता तोंडे , बेबी तोंडे , मिनाक्षी तोंडे जिल्हा संघटीका शैला ताई खंडागळे,तालुका संघटीका अनिता गोणते,कुसगाव संघटीका रोशनी जगताप, वरसोली संघटीका ज्योती चव्हाण, कामशेत शहर संघटीका उषा इंगवले, कामशेत उपसरपंच इंगवले , देहू शहर संघटिका सुनंदा ढमाले,केवरे शाखा संघटीका शोभा दळवी,उप संघटीका निर्मला ढाकोळ, विमल जगताप आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.