Saturday, December 21, 2024
Homeपुणेलोणावळाविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली राहुल शेट्टी यांच्या...

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली राहुल शेट्टी यांच्या कुटुंबीयांची भेट…

लोणावळा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दिवंगत राहुल शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत सांत्वन केले. तेव्हा दरेकर यांनी झालेल्या घटनेचा विरोध केला.
सध्या शेट्टी कुटुंबियांना धीर देणे आवश्यक असल्यामुळे आज ते स्वतः भेट देण्यासाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी बोलताना दरेकर म्हणाले राहुल शेट्टी यांनी लोणावळा शिव सेना शहर अध्यक्ष म्हणून काम केले आहे, आणि अशा प्रकारे जर भल्या माणसांवर गोळया घालण्याचे प्रकार घडत असतील तर त्यामुळे शहराची शांतता भंग होऊन सर्व व्यवस्थेवर याचा दुर्दैवी परिणाम होईल.
आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत असे बोलत ह्या हत्येची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांना शोधून काढा अशी मागणी येथील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी केली व ह्या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले त्यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजप चे मा. ता. अध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजपचे पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगरसेविक ब्रिंदा गणात्रा, भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, पोलीस निरीक्षक दिलीप पवार आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page