Saturday, June 21, 2025
Homeपुणेलोणावळाविध्यार्थी व पालकांसाठी जितेंद्र कल्याणजी यांच्या संकल्पनेतून अनमोल संकल्पना, "माझे जिवन, माझी...

विध्यार्थी व पालकांसाठी जितेंद्र कल्याणजी यांच्या संकल्पनेतून अनमोल संकल्पना, “माझे जिवन, माझी सुरक्षा”..

लोणावळा (प्रतिनिधी):मा. शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र टेलर(कल्याणजी) यांच्या संकल्पनेतून आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून शालेय विध्यार्थ्यांसाठी “माझे जिवन माझी सुरक्षा ” याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
माझे जिवन माझी सुरक्षा या उपक्रमा अंतर्गत शाळेमध्ये जाऊन सुरुवातीला जेव्हा पालक सभा असते त्या ठिकाणी आपण जागृत करून पालक व सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी “माझे जीवन माझी सुरक्षा”अशी थीम तयार केली, त्यामध्ये असे आहे की आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा स्वतःचा मेडिक्लेम करावा जेणेकरून कुठल्याही शाळेमध्ये व कुठे रस्त्यात अपघात झाला व काही मेडिकल इशू आले तर मेडिकल काढला त्याला इमिजेटली ट्रीटमेंट भेटून त्याला फायनान्शिअल प्रॉब्लेम कमी होऊ शकतात त्यासाठी जितेंद्र कल्याणजी यांनी नॅशनल इन्शुरन्सच्या कंपनी व प्रतिनिधीशी बोलणे करून हे ठरवले की प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त सातशे रुपये द्यायचे त्यात 50 हजार रुपये ची पॉलिसी मेडिक्लेम मोफत व त्याच्यावरील विध्यार्थ्याचा दुर्दैवाने कधी अपघातात काही झाले तर त्यांना एक लाख रुपयांचा विमा मोफत,तसेच 50000 चा विमा ही विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे.
यासाठी जितेंद्र कल्याणजी यांनी जनजागृती उपक्रम हाती घेतला असून काल दि.22 रोजी तुंगार्ली येथील गुरुकुल विद्यालयात याबाबत पालक सभेत सर्व विध्यार्थी व पालकांना संबोधित केले. तसेच प्रत्येक विध्यार्थ्याचा हा विमा असणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. त्याचबरोबर लोणावळा परिसरातील आणखी शाळेनी देखील त्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परवानगी दिली असून पालक सभेच्या दिवशी ही जनजागृती करण्यात येणार असल्याचे जितेंद्र टेलर(कल्याणजी) यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page