लोणावळा (प्रतिनिधी) : व्ही.पी.एस. हायस्कुलच्या विध्यार्थ्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या शोशल मीडिया वर प्रसिद्ध होत असून शाळेबाबत उलट सुलट चर्चा चालु आहेत.याच पार्श्व् भूमीवर शाळा प्रशासनाने आपले मत मांडले आहे.
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही . पी.एस .हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ही एक तालुक्यातील नामांकित विद्याशाखा आहे.100 वर्षे ज्ञानदानाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा शाखेने आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये अनेक नामांकित विद्यार्थी घडविलेले आहेत.आपल्या लोणावळेकरांच्या व मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच ही संस्था चांगले काम करीत आहे.
अत्यंत अल्प दरातील फी मध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही शाळा कधीही गरीब – श्रीमंत , उच – निच असा भेदभाव करीत नाही . उलट गरीब पालकांच्या मुलांचे शिक्षण फी अभावी खंडीत होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांची फी देखील माफ केली जाते .
आपली शाळा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तसेच वर्षानुवर्षे उत्कृष्ठ निकालाची परंपरा तसेच प्रशिक्षित शिक्षक वर्ग असल्याने अशा हया नामांकित शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालकाची धडपड चालु असते . प्रथम येईल त्याला प्रथम प्रवेश हया तत्वावर सर्व तुकडयांमधील प्रवेश केले जातात त्याचप्रामणे लोणावळा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती , पालक , नागरीक यांचा मान राखुन त्यांनी सुचविलेल्या गरीब पाल्यांना देखील प्रवेश दिला जातो . त्यामुळे वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता व सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना शिस्तीला थोडी अडचण येत असते.
तरीही विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी शिस्तीबाबत जागरूक असतात . शाळेमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा मारामारी होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते.अगदी शाळेच्या गेटबाहेर देखील शिक्षक शिस्तीसाठी उभे असतात.परंतु काही बाहेरील विद्यार्थी व विद्यालयातील विद्यार्थी मिळून कोणत्याही किरकोळ कारणावरून रस्त्यावर गेट च्या बाहेर ते रेल्वे ग्रांउड पर्यंत कोठेही भांडणे करताना दिसुन येतात त्यास शाळा प्रशासन कसे जबाबदार असू शकते . बाहेरील विद्यार्थी व रोड रोमीओवर कारवाई व्हावी म्हणून शाळेने पोलीस प्रशसनालादेखील लेखी कळविलेले आहे.
पोलिस प्रशासनाचे देखील सहकार्य असते त्यांचा गेट बाहेर राउंड असतो . शाळेत पालक सभा वेळोवेळी घेतल्या जातात त्यामध्ये मुलांना मोबईल व दुचाकी गाडी वापरण्यास देऊ नये असे अनेक वेळा सुचना दिलेल्या आहेत . विद्यार्थ्याच्या मारामारीचा व्हीडीओ हा शाळेच्या आवराबाहेरील रोडवर घडलेली घटना आहे.तरीही शाळेचेच विद्यार्थी असल्याने शाळेने जबाबदारी झटकलेली नाही तर घटना घडल्यानंतर सदर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळा प्रशासनाने बोलावून घेतले व झालेल्या गंभीर घटनेची जाणीव करून दिली व सदर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
विद्या प्रसारिणी सभेचे अध्यक्ष मा . डॉ . गो . व्यं . शिंगरे , व कार्यवाह मा . डॉ . सतीश गवळी यांनी उदया दिनांक 17 रोजी संस्थेच्या लोणावळ्यातील सर्व विद्याशाखांमधील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांची एकत्रित सभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये शालेय शिस्त व शैक्षणिक विषयावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे .
आज शाळेमध्ये सर्व पत्रकार व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते शाळेचे माजी विद्यार्थी व हितचिंतक येऊन माहिती घेतली व शाळेने केलेली कार्यवाही योग्यच आहे असे सांगीतले त्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले जात आहे. असे पत्रक शाळा प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे.