Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळाविध्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवा, यशवंत व्हा!कीर्तिवंत व्हा !-वत्सलाताई वाळंज..

विध्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवा, यशवंत व्हा!कीर्तिवंत व्हा !-वत्सलाताई वाळंज..

लोणावळा : विद्यार्थीनी नी आपला वेगळा ठसा उमटवला पाहिजे. यशवंत व्हा!कीर्तीवंत व्हा! तुम्हाला पुढील शिक्षणासाठी काही मदत लागल्यास आवश्यक सांगा असे मनोगत अंबावणे मा. सरपंच सौ वत्सलाताई नंदकुमार वाळंज यांनी व्यक्त केले. सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी च्या निरोप समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.तसेच सर्व परीक्षार्थिना शुभेच्छा देऊन मौलिक मार्गदर्शन केले.
अंबावणे येथील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला. या प्रसंगी आंबवणे गावाच्या मा.आदर्श सरपंच व कोराईगड शिक्षण संस्था संचालिका सौ. वत्सलाताई नंदकुमार वाळंज, पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष योगेशभाऊ वाळंज, विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवर व सर्व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी सौ. वत्सलाताई वाळंज यांनी आपले मनोगत व्यक्त करत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेत सातत्याने राबवले जाणारे उपक्रम व इतर कामकाजामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.व जड अंतःकरणाने हा समारंभ आठवणींनी उजळून निघाला.यावेळी योगेशभाऊ वाळंज, भटू देवरे, संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर या शिक्षकांनी मनोगतातून मार्गदर्शन केले. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी पृथ्वीगोल प्रतिमा विद्यालयास भेट दिली. वर्गशिक्षक रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला. राहुल आवळे,विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी , महादेव खेडकर, मंदा दळवी, अरुणा दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page