if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
रेल्वेचे ” वाणिज्य निरिक्षक शिरिष कांबळे ” यांनी केली उल्लेखनीय कामगिरी..फुकट्या प्रवाशांकडुन अवघ्या ३ तासांत ३४ हजार रुपयांची दंड वसुली…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक गोष्ट आठवणीने व त्या त्या वेळी करणे खूपच गरजेचे असते , आपली ” जीवन वाहिनी ” असलेली रेल्वे यामधून प्रवास करताना योग्य वेळी , योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी नागरिकांचा कल असतो , मात्र यासाठी देश हित बघणे , हे देखील अती महत्त्वाचे आहे . रेल्वे स्थानकावर गेल्यावर स्टेशन तिकीट लागते , मग प्रवास करताना तिकीट नको का ? आपला मासिक पास शिल्लक दिवसांचा आहे का , व तिकीट काढूनच प्रवास करणे म्हणजे देशसेवा आहे , हे आपले कर्तव्य बजावणारे रेल्वेचे लोणावळा वाणिज्य निरिक्षक शिरिष कांबळे , यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त करत आज त्यांनी कर्जत – नेरळ – खोपोली या ठिकाणी आपल्या सहकारी कर्मचारी तसेच आर पी एफ , पोलीस ताफ्यासह बिना तिकीट फुकट्या प्रवाश्यांना तिकीट तपासून केलेल्या मोहिमेत अनेकांना पकडले . त्यांच्या या मोहिमे अंतर्गत केलेल्या ” उल्लेखनीय कामगिरी ” मुळे रेल्वे प्रशासनात त्यांचे कौतुक होत आहे .
बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी लोणावळा डिव्हीजन मुख्य वाणिज्य निरिक्षक श्री. शिरीष कांबळे यांनी आपले सहकारी तपासणी कर्मचारी व आर पी एफ तसेच पोलिस बंदोबस्तात तिकीट तपासणी मोहीम कर्जत – नेरळ – खोपोली या ठिकाणी सकाळी ९ ते १२ या दरम्यान राबवली . या मोहीमेत तब्बल १५० च्या वर ” फुकटे ” प्रवास करणारे प्रवासी आढळून आले . यावेळी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तब्बल ३४ हजारांचा महसूल त्यांनी दंड वसुली केली .
विना तिकीट प्रवास केल्याने आपण सुरक्षित नसतो , तर यामुळे देशाचे देखील आर्थिक नुकसान होत असते व केलेल्या फसवणुकीने या परिसरात तिकीट किंवा पास काढले जात नसल्याने रेल्वे लोकल गाड्यामध्ये देखील वाढ होत नसल्याने , रेल्वे प्रवासात तिकीट काढूनच प्रवास केल्याने देशसेवा घडेल , असे मत वाणिज्य निरिक्षक शिरिष कांबळे यांनी व्यक्त केले . त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .