Wednesday, August 6, 2025
Homeपुणेमावळविविध मागण्यांसाठी आर पी आय (A) चे वडगांव मावळ येथे आंदोलन...

विविध मागण्यांसाठी आर पी आय (A) चे वडगांव मावळ येथे आंदोलन…

वडगांव (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी वडगांव मावळ तहसील कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाध्यक्ष विकास साळवे व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मावळ तालुक्यातील कामशेत वडगांव तळेगाव आदी पोलीस ठाण्यातील ॲट्रॉसिटी अॅक्ट ( 3/1 ) मधील गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, करंजगांव येथील किशोर तंबोरे याचा खून प्रकरणाला दीड वर्ष झाले तरी अद्याप आरोपी निष्पण न झाल्याने ही केस सी.बी.आय.कडे देण्यात यावी तसेच मावळ तालुक्यासाठी स्वतंत्र मा.उपविभागीय आयुक्तांची नेमणुक करण्यात यावी, व पंचायत समिती मावळ येथील विस्तार अधिकारी श्री.बी.बी.दरवडे व जुन्नर येथील ग्रामीण विकास अधिकारी श्री.बाळासाहेब वनघरे यांच्यामध्ये फोनद्वारे जातिवाचक विधान झाल्याच्या विरोधात वडगांव पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अॅक्ट ( 3/1 ) नुसार गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या वतीने मावळ तहसीलदार मदुसूदन बर्गे यांना देण्यात आले. व त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सदर निवेदनातील गांभीर्य लक्षात घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सदर विषयी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना देण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार बर्गे यांनी दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
यावेळी आर पी आय (आठवले ), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, विश्वकर्मा ह्युमन संघटना, ओ बी सी संघटना, बेलदार संघटना आदी विविध संघटनानी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला तसेच विविध भागातून मोठया प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी संपन्न झाले.
सदर ठिय्या आंदोलन आर पी आय ( ए ) चे जिल्हाध्यक्ष विकास साळवे व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अरूणभाऊ भिंगारदिवे,महाराष्ट्र प्रदेश सचिव राजूभाऊ आठवले,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र आप्पा गायकवाड,तालुका कार्याध्यक्ष सुनिल सोनवणे,युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे,जे के गरड,युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओहाळ,उपाध्यक्ष सचिन साळवे,कोष्याध्यक्ष किशोर वंजारी,कामशेत शहराध्यक्ष दिनेश शिंदे,पिंपरी चिंचवड महीला शहराध्यक्षा लताताई कांबळे,युवक शहराध्यक्ष नितीन पटेकर,शाखाध्यक्ष सागर वाघमारे,रहीम कुरेशी,लोनावळा युवक शहराध्यक्ष निलेश देसाई,सी एम गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले तर आंदोलनास पाठिंबा जाहीर करताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे – शशीभाऊ गायकवाड,प्रविण साळवे,भिमराव ओहाळ,आर पी आय (आठवले) चे – किसन अहीरे,सिध्दार्थ चौरे,अतूल सोनवणे,बबनराव ओहाळ,प्रशांत चव्हाण,बेलदार संघटनेचे – महेश मोहीते,विश्वकर्मा ह्युमन संघटनेचे – शंकर भालेकर,भ्रष्टाचार निर्मुलन व माहीती अधिकार संघटनेचे – बाळासाहेब गरूड,बाळासाहेब दळवी,चंद्रकांत ससाने व पिडीत कुटूबांतील पप्पू तंबोरे आदी जन उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page