Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन " भूमिपूजन कार्यक्रमास सर्व समाजाने उपस्थित...

” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” भूमिपूजन कार्यक्रमास सर्व समाजाने उपस्थित रहा – प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे लाडके ” मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ” आणि कर्जत मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी आंबेडकरी अनुयायी व सर्व बौद्ध बांधवांची अनेक वर्षे असलेल्या मागणीनुसार ” भारतीय घटनेचे शिल्पकार , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” कर्जत शहारामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे , त्यांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करून सतत तेवत ठेवण्यासाठी ५ करोड रुपये निधी मंजूर करून साकारण्यात येणार आहे . या ” अस्मितेचे प्रतीक ” असलेल्या वास्तूचे भूमिपूजन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठीक ११ वाजता फायर ब्रिगेड इमारत शेजारी मुद्रे येथे होणार असून या कार्यक्रमास सर्व समाज बांधव , महिला भगिनी यांनी उपस्थित राहून ” इतिहासाचे साक्षीदार ” व्हा , असे आवाहन कर्जत न. प. चे प्रथम उपनगराध्यक्ष तथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी केले आहे.

कर्जतमध्ये विश्व रत्न महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन व्हावे , हि तमाम कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनता व बहुजन समाजाची मागणी होती . यासाठी खूप वर्षे संघर्ष करावा लागला . शांततेचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध यांचा मार्ग नवीन पिढीला मिळावा , व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बुध्दीस बळ देण्यास उपयुक्त ठरावे , व देशाची भावी पिढी बुद्धिवान घडावी म्हणून ” स्वप्नांची पूर्ती तर वचनाची जागृती ” होवून कर्जत नगरीत ” सांस्कृतिक व धार्मिक ” क्षेत्रात भर घालून ” सुवर्ण ” अक्षरात नोंद होणारी ” ऐतिहासिक वास्तू ” साकारण्यात येणार आहे .
कर्जत तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी , बौद्ध बांधव , व बहुजन वर्गाची अस्मिता ठरणाऱ्या या ” न भूतो – न भविष्यती ” अश्या ऐतिहासिक वास्तूत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वोच्च भारतीय संविधान हाती असलेले उभे स्मारक , त्यांच्या प्रगल्भ व मौलिक विचारांना चालना देणारे साहित्य लायब्ररी व त्यांच्या आजपर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारे संग्रहालय , असे स्वरूप या वास्तूत असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची हि ” वचनपूर्ती ” असून त्यांनी दिलेला शब्द पाळला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . या वचनपूर्तीमुळे सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे . म्हणूनच ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” या भव्य – दिव्य वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी , नागरिकांनी , महिला वर्गांनी , तरुण – तरुणी , व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ” एस.आर.पी. जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव ” यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page