कार्ला (प्रतिनिधी) : विसापूर किल्ल्याच्या परिसरात शिवकालीन तोफ आढळून आली आहे . भारतीय पुरातत्त्व विभागाच्या व शिवभक्तांच्या सहाय्याने ही शिवकालीन तोफ लवकरच किल्ल्यावर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याठिकाणी भेट देऊन लवकरच तोफ किल्ल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार असून यासाठी स्थानिक व शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विसापूर किल्ल्याच्या मध्यभागी काही महिन्यापूर्वी मालेवाडी येथील युवक अनंता गोरे यांना दुकानाचे किरकोळ काम करण्यासाठी आवश्यक दगडी गोळा करण्यासाठी ते परिसरात आले असता त्यांना मातीत गाडलेली तोफ दिसली . त्यांनी ती गाडलेली तोफ बाहेर काढून किल्याच्या मध्यभागी पायऱ्यांशेजारी ठेवली.
त्यानंतर प्रकाश गोरे , भीमा शिंगाडे , यांना ही माहिती कळवली . गोरे व शिंगाडे यांनी तोफेची माहिती विशाल भाऊसाहेब हुलावळे , शिवप्रसाद सुतार , विश्वनाथ जावळीकर सर , दिगंबर पडवळ यांना दिली . त्यांनी तात्काळ पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मंडवरेकर , मावळचे आमदार सुनील शेळके , तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना याबाबत माहिती दिली.