Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रवीज बिल कमी न केल्यास भाजप आणखी तीव्र आंदोलन करणार..

वीज बिल कमी न केल्यास भाजप आणखी तीव्र आंदोलन करणार..

भाजप नेते ब्रम्हानंद पडळकर स्वागत नगर महावितरण केंद्रावर टाळा ठोको आंदोलन..

सांगली.राज्यातील महाआघाडी सरकार जनतेला वीज बिलाच्या प्रश्‍नावरून विनाकारण त्रास देत आहे. उर्जा मंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आता घुमजाव केला आहे. हा एकप्रकारे वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांवर अन्याय आहे.

राज्य सरकारने 100 युनिट पर्यंतचे लाईट बिल माफ करावे आणि दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा भाजपच्यावतीने यापुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिला आहे.


भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदार संघाच्यावतीने शुक्रवारी आटपाडी येथील महावितरण केंद्राच्या विरोधात माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या उपस्थितीत टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले, त्यावेळी पडळकर बोलत होते.

यावेळी मा.बंडोपंत देशमुख जि.प.स.अरुण बालटे, माजी उपसभापती जयवंतराव सरगर, ता.अध्यक्ष उमाजी सरगर माजी अ.प्रभाकर पुजारी, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव काळेबाग, मा.विष्णु पंत अर्जुन, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल सुर्यवंशी, आटपाडी डेपोटी कोळेकर सर आदींची उपस्थिती होती.

पडळकर साहेब पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या सांगण्यावरून सुमारे 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस महावितरणने पाठवली आहे. सामान्य वीज ग्राहक आणि शेतकर्‍यांना त्रास देण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने रचलेले आहे. सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते तर माफ केले नाही उलट सरकारकडून लाईट बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्याची भाषा सुरू आहे.

लॉकडाऊनच्या काळात सामान्य माणूस मेथाकुटीला आला आहे. त्यांना आलेले लाईट बिल एकदम भरणे शक्य नाही. त्यामुळे आघाडी सरकारने 100 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे व राहिलेले बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी, अशी आमची मागणी आहे, त्यासाठी हे आंदोलन राज्यात सर्वत्र सुरू आहे. एवढे करूनही राज्य सरकारने सक्तीची वीज बिल वसुली सुरू ठेवल्यास यापुढे भाजप आणखीन तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास पूर्णपणे शासनच जबाबदार राहील, असा इशाराही ब्रम्हानंद पडळकर यांनी दिला यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आटपाडी येथील महावितरण केंद्राजवळ मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page