if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली(दत्तात्रय शेडगे) बोरघाटाचे जनक ,धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव आज बोरघाटात शिंग्रोबा मंदिरात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंग्रोबा देवाचा दुधाचा अभिषेक ,सत्यनारायण महापूजा करून नंतर आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ..यावेळी सरकारी नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक बबन शेडगे, बाळासाहेब आखाडे अध्यक्ष भरत कोकरे, माजी अध्यक्ष दीपक आखाडे ,एकनाथ घाटे बबन जानकर, सरपंच नागेश मरगले, युवा नेते नारायण हिरवे,बापू बावदाने, लक्ष्मण बावदाने, आतकरगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शेडगे, आपटा ग्रामपंचायतच्या सदस्य संगीता लक्ष्मण बावदाने,आदी उपस्थित होते.