Saturday, August 2, 2025
Homeपुणेमावळवेट एन जॉय(मालपाणी) च्या विरोधातील आंदोलकांना सर्वोत्परी न्याय मिळवून देणारच,किरण राक्षे...

वेट एन जॉय(मालपाणी) च्या विरोधातील आंदोलकांना सर्वोत्परी न्याय मिळवून देणारच,किरण राक्षे…

मावळ (प्रतिनिधी) : वेट एन जॉय (मालपाणी) च्या हुकूमशाही विरोधात मावळातील भूमिपुत्रांच्या ठिय्या आंदोलनास आज अखेर सहावा दिवस उजडला असून अद्यापही हे 22 कामगार न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यांना न्याय मिळणार का ?
अनेक दिग्गजांच्या मावळ भूमितील भूमिपूत्र आज रोजगारहीन होऊन न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ही खरोखरच मावळ वासियांसाठी शरमेची बाब आहे.कामावरून निलंबित बावीस कामगारांकडे न पाहता बावीस कुटुंबाचा विचार करून या भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी राजकारण न करता फक्त लोकप्रतिनिधीनीं युवकांना न्याय मिळण्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे.
सहा दिवसाच्या ठिय्या आंदोलनानंतरही या भूमिपुत्रांना न्याय अद्याप मिळाला नाही तर उलट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही हे आंदोलक खचले नाही. त्यांना कामावर रुजू न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलकांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलकांबरोबर खंबीर पणे उभे आहोत.तसेच या भूमिपुत्रांना न्याय द्या राजकारण नको. या युवकांना पुढील दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे भाजपा संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष किरण राक्षे यांनी सांगितले.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,भाजपा कामगार आघाडी तालुका अध्यक्ष अमोल भेगडे, अभिमन्यू शिंदे, गणेश ठाकर, शेखर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, किसन येवले व आंदोलक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page