if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कर्जत शहर बचाव संघर्ष समितीचा ” आंदोलनाचा ” एल्गार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )घोडा का अडला , भाकरी का करपली , पान का सडल , तर न फिरवल्यामुळे ! प्रत्येक गोष्टीस , त्या त्या वेळी लागलीच प्रक्रिया केल्यास त्यातून चांगल निष्पन्न होत असते , नाहीतर त्यातून समस्यांचा डोंगर उभा रहात असतो . शहराचा मध्यबिंदू पासून १ किलो मिटर अंतर असलेल्या परिसरात कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील ” नागरी समस्यांचे ” निराकरण करण्यात पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे व त्यांच्या प्रशासकीय टीम ला अपयश आल्यामुळे आणि नेहमीच केलेल्या तक्रारींचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ” कर्जत शहर बचाव संघर्ष समितीने ” याविरोधात ” संघर्षाचा पवित्रा ” घेतला असून सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून लोकमान्य टिळक चौकात ” बेमुदत साखळी उपोषण ” करण्याचा निर्णय घेतला आहे .
कर्जत नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट कामकाज मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अधिकार क्षेत्रात सुरू आहे . ” सुनियोजित गरजा ” पूर्ण करण्याच्या नागरिकांच्या तक्रारी असतानाही याची दखल न घेणाऱ्या पालिकेला संघर्ष समितीने यापूर्वी २५ सप्टेंबर आणि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी समस्यांवर उपाय योजनां करण्यासाठी निवेदने सादर केली होती . मात्र शेकडो कामगारांचा फौजफाटा असतानाही ठोस कृती न झाल्याने याविरोधात संतप्त आंदोलनाचा इशारा दिला होता. इमाने इतबारे कर भरून नागरिकांच्या मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर होणाऱ्या संघर्षाला पालिकाचे ” सुस्त प्रशासन ” हे येथील कायदा – सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार असणार , असा सज्जड इशारा देखील दिला आहे .
कर्जत नगरपरिषद हद्दीत कर्जत शहर , मुद्रे , दहीवली , गुंडगे , भिसेगाव या परिसरात भौगोलिक आणि तांत्रिक दृष्ट्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मात्र पाण्याची समस्या सर्वच भागात ” कॉमन ” बनली आहे . शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न , कचऱ्याचे साम्राज्य आणि छोट्या मोठ्या गलीच्छ कारभाराचा त्रास शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा होत आहे . या आणि अशा अनेक नागरी समस्या घेऊन कर्जत शहर बचाव संघर्ष समितीने नगरपरिषद प्रशासन विरोधात गेल्या काही महिन्यापासून संतप्त लढा देत आहेत.
निवडणुकीचे दिवस जाऊनही समाधानकारक काम न झाल्यानेच कर्जत शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून ” बेमुदत साखळी उपोषण ” करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी दिली. आज त्यासंबंधीचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले . यावेळी अनेक समस्याग्रस्त कर्जतकर नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .