if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):अवैध गावठी हातभट्टी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत भट्टी उध्वस्त करण्यात आली.ही कारवाई दि.7 रोजी सायंकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास वेहेरगाव, देवकर वस्ती ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली.
लोणावळा ग्रामीण स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील देवकर वस्तीवर,ता.मावळ जि. पुणे येथे सायंकाळी 06:00 वा.च्या सुमारास मानवी शरीरास हानी होईल असे गावठी हातभट्टी लावून गावठी हातभट्टी तयार करण्याचे काम सुरु असल्याची बातमी मिळाल्याने, लागलीच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे सपोनि शेवते,पोसई भोसले,पोहवा विजय मुंढे,पोना गणेश होळकर, पोकॉ विनोद गवळी,तळपे,खैरे, होमगार्ड कुंभार,इंगवले,शिर्के या पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी प्रत्येकी 200 लिटरचे 24 बॅरल कच्चे हातभट्टी तयार करण्याचे रसायन भरलेले एकूण 4800 लिटर एकूण किंमत 2,40,000/- रुपयाचे कच्चे रसायन मिळाले ते जागीच पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. यातील आरोपी करण बाळू राठोड याच्या विरुद्ध गु.र.न.539/2023 महाराष्ट्र दारू अधिनियम 65 (सी,एफ), भा. द.वि.का.क.328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई भोसले हे करित आहे.