लोणावळा : विद्या प्रसरिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि धनंजय काळे यांच्या ईशस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढूमणे यांनी तर प्रास्ताविक वैभव सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्रीनिवास गजेंद्रगडकर आणि शिक्षक प्रतिनिधी अनिल खामकर, मराठी विषयाचे विभाग प्रमुख हरिभाऊ कुलकर्णी, ज्योती डामसे, शुभांगी कडू, श्री.मुकुंद शिंदे उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत येऊन मराठी भाषा गौरव दिन याविषयी भाषणातून मराठी भाषेचे महत्व व कुसुमाग्रज यांच्या विषयीची अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. कविता, गीतं यांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. कला शिक्षक योगेश कोठावदे यांनी दिग्दर्शित केलेली छोटी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. गंगाधर गिरमकर यांनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन वैभव सूर्यवंशी यांनी अतिशय उत्तम रितीने केले.
नियोजनबद्ध झालेल्या कार्यक्रमाचे कौतुक नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष मा. भगवानभाऊ आंबेकर यांनी केले.कार्यक्रमाचे माहिती संकलन संजय पालवे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मनीषा खेडकर यांनी व्यक्त केले.