Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळाव्ही पी एस हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य विजय जोरी यांना "शिक्षक साहित्य" पुरस्कार...

व्ही पी एस हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य विजय जोरी यांना “शिक्षक साहित्य” पुरस्कार प्रदान…

लोणावळा (प्रतिनिधी):तळेगाव येथील रहिवासी व व्ही पीएस हायस्कूल लोणावळा चे सेवानिवृत्त प्राचार्य विजय जोरी सर यांना “शिक्षक साहित्य”पुरस्कार प्रदान करण्यात आला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह गंजपेठ पुणे येथे पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते रविवार दि.10 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयोजित समारंभाचे अध्यक्षपद लक्ष्मणराव आपटे, प्रशालेच्या प्राचार्या मेधा सिन्नरकर यांनी भूषविले.तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रविंद्र धंगेकर,विनोदी लेखक व सकाळ वृत्तपत्राचे उपसंपादक सु.ल. खुटवड उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी पुण्यातील प्रसिद्ध गायक विवेक पांडे यांच्या व्ही पी एकेडमी तर्फे सुमधूर गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभानिमित्त शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, राष्ट्रसेवा दल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शिवाजी खांडेकर, मायबोली राज्य संघाचे अध्यक्ष लक्ष्मण महाडिक इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे यांनी केले. तर सूत्रसंचालन मीना साळुंके यांनी केले.व जिल्हा मराठी संघाच्या अध्यक्षा कल्पना शेरे यांनी कार्यक्रमाचा समारोप करीत पुरस्कारार्थी व मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page