if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल आणि द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश..
लोणावळा: विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल आणि द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट निकालामुळे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता व्ही.पी.एस ने यंदाच्या निकालात अव्वल स्थान पटकावले आहे.
खेळ, विविध उपक्रम आणि अभ्यासाची सांगड घालताना विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागली. तरीही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक शाळेबरोबर लोणावळा परिसरातील पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील एकूण 949 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 924 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 97.57% लागला आहे. विज्ञान शाखेत आर्यन दळवी (91.17%), कृष्णा सुकुमारन (86.00%), तन्वी कालेकर (85.33%) यांनी उत्कृष्ट गुण मिळवले. इंग्रजी वाणिज्य शाखेत यज्ञेश नाणेकर (89.17%), ऋतुजा सूर्यवंशी (88.33%), स्नेहा सागर (87.83%) यांनी आणि मराठी वाणिज्य शाखेत तुषार गायकवाड (78.67%), प्रणव कडू (78.58%), सुनिता घारे (78.33%) यांनी उच्च गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे आर्यन दळवी याने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले.
दहावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. परीक्षेसाठी 325 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल 92.92% लागला आहे. निकालात सुप्रिया भानवसे (93.20%), साक्षी सिंग (87.40%), आयेशा खान (87.20%), कार्तिक शिंगारे (85.60%), निशा अगरवाल (84.20%) यांनी अव्वल स्थान पटकावले.
व्ही.पी.एस हायस्कूल आणि द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 80% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरापेक्षा जास्त आहे. विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाला समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे आणि ज्येष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.