if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा: विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोके व वैशाली तारू यांनी केले. संजय पालवे आणि गंगाधर गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट आणि गाईड परेड व बँड पथकाद्वारे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मॉन्टेसरी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य याद्वारे उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी विद्या प्रसारीणी सभेच्या अध्यक्षा डॉक्टर मृणालिनी गरवारे, नियामक मंडळाचे सदस्य नितीन गरवारे तसेच शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर, धीरूभाई कल्याणजी, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव, शिक्षक प्रतिनिधी अनिल खामकर, शिक्षकेतर प्रतिनिधी रवी दंडगव्हाळ, मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर यांनी आपल्या मनोगता मधून विद्यार्थ्यांना आई-वडील, शिक्षक व समाजातील ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. गरवारे यांनी विद्यार्थ्यांना देशाचे आधारस्तंभ बनण्याचे आवाहन केले.