Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडशाळकरी मुलांचे हाल, नागरिकांची संतापलेली प्रतिक्रिया ; ट्रॅफिक कोंडीतून भाजपच्या कामपद्धतीवर सवाल..

शाळकरी मुलांचे हाल, नागरिकांची संतापलेली प्रतिक्रिया ; ट्रॅफिक कोंडीतून भाजपच्या कामपद्धतीवर सवाल..

” ट्रॅफिक जाम करून लोकसेवा करू नका ” कर्जतकर नागरिकांचे भाजप पदाधिकाऱ्यांना ” उपदेशाचे ” डोस, सोशल मीडियावर उमटल्या ” संतप्त ” प्रतिक्रिया…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरात ” वाहतुकीची समस्या ” दिवसेंदिवस गंभीर होत असताना यावर ” बुजगावणे ” संबंधित अधिकारी उखडलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या ” खुर्च्या ” हलवायच्या सोडून पक्षाचे कार्यकर्ते ” श्रेयवादाची लढाई ” लढत नागरिकांना या वाहतुकीचा त्रास कसा होईल ? याकडे लक्ष देत त्या उखडलेल्या रस्त्यावर काम करत ” ट्रॅफिक जाम ” च्या समस्या तयार करत असल्याचे चित्र कर्जतमध्ये सध्या घडत असताना दिसत आहेत.


शनिवार व रविवारचा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करून कर्जतकर नागरिक कुठे ” मोकळा श्वास ” घेत नाहीत तर सोमवार दिनांक २८ जुलै २०२५ रोजी ऐन ” कामकाजाच्या व विद्यार्थ्यांच्या शाळेत ” जाण्याच्या वेळेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दहिवली श्रीराम पुलावर उघडलेल्या रस्त्याचे सुधारित करण्याचे काम स्वखर्चाने हाती घेतले . हे काम करत असताना जवळ जवळ तास दोन तास वाहतूक कोंडी होऊन ” वाहतूक कोंडीला ” १ की. मी. अंतरापर्यंत अनेकांना सामोरे जावे लागले . हि वाहतूक कोंडी श्रीराम पुलाच्या चारी दिशेला झाल्याने यांत अनेकांना त्रास सहन करावा लागला . यांत ” शाळेच्या विद्यार्थ्यांना ” देखील त्रास सहन करून चालत जाऊन शाळेत उशिरा पोहोचल्याची घटना घडली आहे.


भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे काम जरी चांगले करत असले तरी ती ” वेळ ” काम करण्याच्या जमेची नव्हती , अश्या संतप्त प्रतिक्रिया ” सोशल मीडियावर ” उमटल्या . राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने ” कामचुकार अधिकाऱ्यांचे कान उपटायचे ” सोडून स्वखर्चाने करत असलेली कामे अशा अधिकाऱ्यांना अजून ” बेजबाबदार ” बनवत असून अशी ” ट्रॅफिक जाम ” करून करत असलेल्या कामांपूर्वी संबंधित कार्यालयाची ” परवानगी ” घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ” छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने ” मांडली आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page