लोणावळा ( प्रतिनिधी ) : लोणावळा शहरातील व्ही.पी. एस. विद्यालयाच्या आवरा बाहेर झालेल्या विध्यार्थ्यांच्या हाणामारीची दखल घेत शाळा प्रशासनाकडून हाणामारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दिवाळी पर्यंत बडतर्फ करण्यात आले आहे.
सर्व क्षेत्रात नावाजलेल्या विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा विद्या शाखेतील काही विध्यार्थी शाळा सुटल्यानंतर आवरा बाहेर हाणामारी करणारा व्हिडीओ व्हायरल झाला. सदर प्रकार हा शाळेच्या बाहेर घडला असला तरी विध्यार्थी हे शाळेचेच असल्यामुळे. विध्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करत कायम बडतर्फ न करता त्यांच्या पालकांना बोलावून घडल्या प्रकाराची जाणीव करून. या विध्यार्थ्यांना येत्या दिवाळी पर्यंत बडतर्फ करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला. तसेच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल असेही शाळेकडून सांगण्यात आले.
पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत येताना मोबाईल अथवा दुचाकी देऊ नये अशा सूचना शाळेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीसांनी शाळा सुटते वेळी अथवा भरतेवेळी शाळेत राऊंड मारल्यास शाळेबाहेर घडणाऱ्या अशा प्रकारांना आळा बसेल. असे मत शाळेच्या वतीने प्राचार्य दरेकर यांनी मांडले.