लोणावळा : लोणावळा शहरात गुरुवार दि.12 पासून आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून महाराज्यस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी अभियानाचे अयोजन करण्यात आले आहे .
शासन आपल्या दारी या अभियनांतर्गत पहिल्याच दिवशी लोणावळा शहरातील महिला, पुरुष व तरुण तरुणी अशा असंख्य नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेन्यासाठी गर्दी केली होती. या अभियानांतर्गत आज लोणावळा शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक 1 , बापूसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी व भोरी सॅनेटोरियम रायवुड येथे अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवीन आधार कार्ड काढणे , जुने आधारकार्ड दुरुस्त करणे , नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे , खराब झालेली शिधापत्रिका बदलणे , संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना , वृद्धपकाळ , विधवा , दिव्यांग , राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना , नवीन वीज कनेक्शन अर्ज स्विकृती , बिजबिल दुरुस्ती , नवीन मतदार नोंदणी , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , जात प्रमाणपत्र , जन्म मृत्यू नोंदणी व विवाह
नोंदणी प्रमाणपत्र , दिव्यांग प्रमाणपत्र , दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड नोंदणी करणे तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या विविध योजनांबरोबर कोविड प्रतिबंधात्मक लस देखील नागरिकांसाठी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोणावळा शहरात गुरुवार व शुक्रवार या दिवशी वरील तीन ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे तर मंगळवार आणि बुधवार व्हीपीएस हायस्कूल गवळीवाडा , श्री साई मंदिर रामनगर भुशी , हॉटेल आदर्श, शिवाजी पेठ खंडाळा . तसेच गुरुवार आणि शुक्रवार दि.19 आणि दि 20 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय तुंगार्ली , महादेव मंदिर हॉल वलवण याठिकाणी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच आज आमदार सुनिल शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद शाळा क्र 1 याठिकाणी स्वतः येऊन येथील कामाचा आढावा घेतला त्यावेळी बोलताना शासन आपल्या दारी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, आरोही तळेगावकर, महिला अध्यक्षा उमाताई मेहता, भरत हारपुडे, संजय घोणे, उमेश तळेगावकर, नितेश जाधव, जयेश देसाई, राजेश मेहता, राजू बोराटी, जाकीर खलिफा, संध्या खंडेलवाल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी सुनील अण्णा शेळके युवा मंचचे सर्व कार्यकर्ते, लोणावळा नगरपरिषद व विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी मोठया संख्येने या अभियानात सहकार्य करत आहेत.
लोणावळा शहरात यापूर्वी 12 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे हे अभियान रद्द करावा लागले होते तरी आज या अभियानाला लोणावळ्यात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.