Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिक्षणानेच मानवाची प्रगती होते , हे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा...

शिक्षणानेच मानवाची प्रगती होते , हे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले ” यांचे थोर विचार !

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे विद्यार्थी सन्मान सोहळ्यात गौरोवद्गार..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यास ” शिक्षण रुपी क्षितिजाच्या उंबरठ्यावर ” उभ्या असलेल्या देशाच्या भावी पिढीला पुढील जीवनात ” उत्तेजनार्थ मानसिक बळ ” देण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत खालापूर यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी रॉयल गार्डन सभागृहात १० व १२ वी मध्ये शाळेतून पहिल्या ३ विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे इतर ” कला क्रिडा क्षेत्रात ” अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा नुकताच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील ४६२ विद्यार्थ्यांना व त्यांचे पालक , शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले . तर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी लागणा-या शासकिय दाखल्यांचे वाटप शिबिर देखील यावेळी घेण्यात आले.

त्याप्रसंगी कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करताना म्हणाले की , आजच्या युगात शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे . या शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांनी सांगितले आहे . या शिक्षणाच्या जोरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ” भारतीय संविधान ” आज जगात अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले . विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून आई वडिलांची ईच्छा पुर्ण करावे , असा बहुमूल्य सल्ला सर्वांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणाच्या शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या . तर सुप्रसिद्ध व्याख्याते व मार्गदर्शक गणेश शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व मोबाईल वर जास्त लक्ष केंद्रित न करता अभ्यासाकडे लक्ष देवून आपले सर्वोच्च ध्येय साध्य करावे , यावर प्रकाश टाकत जीवनाचे सार त्यांनी सुसंवाद साधून कथन केला . यावेळी हजारो उपस्थितांची मने त्यांनी जिंकली.

यावेळी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत जिल्हा नेते विजय पाटील, संघटक पंकज पाटील, संघटक शिवराम बदे, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , गजू भाई वाघेश्वर, माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे, मा. नगरसेवक संकेत भासे, युवा नेते प्रसाद थोरवे, राहुल विशे, आसवले, पंढरीनाथ पिंपरकर, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, किसन शिंदे, प्रभाकर देशमुख, मिलिंद विरले, संतोष कोळंबे, प्रविण थोरवे, हर्षद विचारे, गणेश केवारी, जिल्हा नेत्या सुरेखा शितोळे, तालुका संघटीका रेश्मा म्हात्रे , मनिषा दळवी , संघटीका सायली शहासने , सचिन भोईर, प्रसाद पालकर, संतोष मोहिते, बापू चित्ते, दिनेश कडू , आदींसह शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सायली भोसले हिने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर छान काव्य सादर केले . सूत्र संचालन समीर सोमने यांनी केले . या सोहळ्यास सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग लाभला.
- Advertisment -

You cannot copy content of this page