Sunday, September 8, 2024
Homeपुणेमावळशिरोता येथे वनविभागाच्या श्रमदानातून वनराईबंधाऱ्यांची निर्मिती…

शिरोता येथे वनविभागाच्या श्रमदानातून वनराईबंधाऱ्यांची निर्मिती…

मावळ (प्रतिनिधी): शिरोता वनपरिक्षेत्र (मावळ) पुणे वनविभाग मार्फत मौजे बोरवली येथे श्रमदानातुन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.या कामी शिरोता वनपरिक्षेत्र मधील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान करून बंधारा पुर्णत्वास नेला.

या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होणार आहे.नाला किंवा ओढा यातील पाणी यांना स्थानिक रित्या मिळणाऱ्या वस्तुंनी अडवून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करता येते.यामध्ये बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती ,वाळु,दगड वापरून बंधारे तयार करता येतात.याला मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही.हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो. म्हणून यास वनराई बंधारा म्हटले जाते.

हा वनराई बंधारा पक्षी,जनावरे व जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी लाख मोलाची मदत करणार आहे. गावकऱ्यांनीही वनराई बंधाऱ्यावर अधिक भर देत पाणी अडवून, पाणी जिरविण्याचे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले.या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी साठविले जाऊन परिसरातील भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.यावेळी शिरोता वनपरीक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार,वहाणगाव वनपरिमंडळाचे वनपाल सखाराम बुचडे,वनरक्षक लालासाहेब वाघखपुरे, नवनाथ मिलखे, श्रीमती काजल पाटील, श्रीमती जयश्री गोंदवले तसेच वनकर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्य कौतुकास्पद असून वन विभागाने केलेल्या कामाचा आदर्श घेऊन आपन पन आप आपल्या जवळ पास जीथे काम करता येईल अशा ठिकाणी वनराई बंधारे संबधीत आधीकारी यांची परवानगी घेऊन काम करावे असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी केले.

(वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता,सुशील मंतावार :- यावर्षी “एल निनो”च्या हवामान परिणामामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे.त्याअनुषंगाने भुजल पातळीत वाढ होण्यास वनराई बंधारे पाणी अडविण्याचे व पाणी जमिनीत जिरवण्याचे लाख मोलाचे काम करण्याबरोबर निसर्गचक्रातील महत्त्वाची भूमिका बजावत असते.पाण्याचे महत्त्व हे कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही. त्याचा उपयोग आणि महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पाणी अडविले तर भूजल पातळीत वाढ होईल व मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातही पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.)

- Advertisment -

You cannot copy content of this page