लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावच्या हद्दीत दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात MH 14 JZ 1984 या दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 वर्षीय बालकाचा समावेश आहे.
सौ. पुष्पा पवन शर्मा ( वय वर्षे 26), व युवराज पवन शर्मा ( वय वर्षे 3) दोघेही राहणार निगडी, पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाच्या हद्दीत सोमवार दि.27 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून झालेल्या भयंकर अपघातात लहान बाळ व आईचा मृत्यू झाला असून दुचाकी चालवणारी व्यक्ती गंभिर जखमी झाली आहे . हा अपघात अतिशय भयंकर होता. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले असून अपघातग्रस्त वाहने बाजुला केली आहेत.