Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" शिल्पकार साहित्य कला मंडळ " यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अन्न...

” शिल्पकार साहित्य कला मंडळ ” यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अन्न दान वाटप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय घटनेचे शिल्पकार – महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२३ रोजी ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा परतीच्या वाटेकडे जात असलेल्या आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजाला कर्जत रेल्वे स्थानकावर ” शिल्पकार साहित्य कला मंडळाच्या वतीने ” दरवर्षी प्रमाणे आज दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी अल्पोपहार – अन्नदानाचे वाटप करण्यात आले . यावेळी अनेक आंबेडकरी अनुयायांनी या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.

शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत ” पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” व सदस्य दिवंगत गोपीनाथ ओव्हाळ यांच्या प्रेरणेने अध्यक्ष अशोक दादा सोनावळे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतात . दरवर्षी चैत्यभूमी दादर येथून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून परतणाऱ्या बहुजन वर्गाला अल्पोपहार देऊन अन्नदान कार्यक्रम करतात.

यावेळी ” शिल्पकार साहित्य कला मंडळाचे ” अध्यक्ष अशोकदादा सोनावळे यांनी महामानवास पुष्पहार अर्पण करून या अन्नदान कार्यक्रमास सुरुवात झाली . यावेळी शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष अशोकदादा सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी बाळाराम ढोले , खजिनदार जयवंत जाधव , सभासद कमलाकर जाधव , छाया भालेराव , महेंद्र गायकवाड , नागेश गवळे , विकी जाधव आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून सर्वांना अन्नदान वाटप केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page