if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
शिल्पकार साहित्य कला मंडळांने व अनेक मान्यवरांनी दिल्या आठवणींना उजाळा…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” झोपडीत माझ्या वाकूनी आत आले , मनात खोटे राखुनी आत आले……मी कुणाला का ठरवू दोषी, तयांना ओळखाया मीच ठरलो अपयेशी…..कारण स्वार्थी – कपटी – लोभी नगरीचे , होते ते रहिवाशी ….होते ते रहिवाशी……” असे एक ना अनेक अजरामर काव्य लिहून समाजात जनजागृती करणारे कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील ” शिल्परत्न ” व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रबोधनकार – कलारत्न – साहित्तिक – शिघ्रकवी – सांस्कृतिक – धार्मिक – शैक्षणिक – सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चमकणारा तारा , ” गुरुवर्य पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” यांची १ ऑक्टोंबर २०२४ रोजी जयंती मोठ्या उत्साहात घोडके परिवार व शिल्पकार साहित्य कला मंडळाचे पदाधिकारी यांनी खोपोलीत त्यांची मुलगी प्रेरणा सचिन भालेराव यांच्या घरी साजरी केली.
यावेळी विचार पिठावर त्यांच्या सर्व कार्यात सावली सारखी साथ देणारी त्यांची पत्नी सुमन पांडुरंग घोडके , मुलगी सौ. प्रेरणा भालेराव , पत्रकार सुभाष सोनावणे , नरेश जाधव – अध्यक्ष शिल्पकार साहित्य कला मंडळ , माजी अध्यक्ष अशोक दादा सोनावळे , सदस्य – साळुंखे , पत्रकार जगन्नाथ दादा ओव्हाळ , बनसोडे , आदी मान्यवर उपस्थित होते . प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिल्परत्न पी. ए. घोडके यांच्या प्रतिमेस सुमन पांडुरंग घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनेकांनी त्यांच्या स्मृतिस उजाळा दिला . अशोक दादा सोनावळे यांनी जीवन घोडके यांनी कलावंतांसाठी खूप मोठे कार्य केले असून त्यांचे काव्य आजही जिवंत असल्याचे सांगून त्यांची आठवण काव्यातून प्रकट केली . शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष नरेश जाधव यांनी ” गुरुवर्य ” जीवन घोडके यांनी सर्व कलाकारांना एकत्र आणून हि संघटना काढून खूप मोठे मोलाचे कार्य केले आहे , त्यांचे विचार , त्यांचे काव्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम आम्ही सर्व मिळून करू , असे आश्वासन त्यांनी दिले व गुरुवर्य जीवन घोडके यांचे काव्य त्यांनी गायले , त्यांची मुलगी सौ. प्रेरणा भालेराव यांनी त्यांचे वडील यांचे कार्य सर्वदूर पसरवून सर्व कलावंतांना साथ देण्याचे आश्वासन देवून आपल्या वडिलांचा ” जीवनपट ” उलगडला . महापुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो , मात्र आपल्या वडिलांची देखील त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या जन्म दिनी त्यांनी घडविलेले कलाकार उपस्थित राहून त्यांची जयंती साजरी करतात , याचा आम्हाला आनंद होत आहे , असे आदर पूर्ण मत व्यक्त केले , तर जगन्नाथ दादा ओव्हाळ यांनी त्यांचे कार्य माझे वडील दिवंगत नाना ओव्हाळ व गुरुबंधू गोपीनाथ दादा ओव्हाळ यांच्या सोबत कसे होते , हे सांगितले.
१ ऑक्टोंबर १९५२ रोजी पांडुरंग घोडके यांचा जन्म झाला , खूपच हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांच्या वडिलांचे छत्र गेल्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब सांभाळले , व त्यातूनच महापुरुषांचे चरित्र वाचून सर्वगुण संपन्न होवून कला क्षेत्रा बरोबरच राजकीय – शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले . त्यांचे काव्य आजही अजरामर आहे , त्यांनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विठ्ठलजी उमप , प्रल्हादजी शिंदे यांच्या बरोबर गायन केले होते , रायगड बरोबरच कर्जत , खोपोली येथे त्यांनी दलीत पँथर , आर पी आय , कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्यांची आंदोलन , मोर्चे गाजली . नाना ओव्हाळ , ऍड. गोपाळ शेळके , माधव मोकाशी यांच्यासोबत त्यांनी काम केले . ” गुरुवर्य पी.ए.घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा प्रवास खूप संघर्षमय होता , त्यांनी कलावंतांना एकत्रित रहाण्यासाठी ” शिल्पकार साहित्य कला मंडळाची ” स्थापना केली , हे मंडळ त्यांचे ” जीव की प्राण ” होते.
सदर कार्यक्रमास त्यांची पत्नी सुमन घोडके , मुलगी प्रेरणा , प्रगती , सून विद्या घोडके , जागृती घोडके , जावई सचिन भालेराव , नातवंडे – प्रद्युम्न , सुधांशू , शास्वत , प्रांजली , शास्वती , गार्गी , हर्षु , आर्यया त्याचप्रमाणे पत्रकार , अनेक नागरिक , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.