भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे) भारत देशाचा ७५ वा ” प्रजासत्ताक दिनानिमित्त ” आज २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० – ०० वा. कर्जत – मुरबाड रोड येथील शिवतीर्थ – पोसरी येथे ध्वजारोहण कार्यक्रम कर्जत -खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडले . यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघातील अनेक शासकीय अधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे , तहसीलादर डॉ शीतल रसाळ , पोलीस उपअधीक्षक विजय लगारे , कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड , नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , मा . उपसभापती मनोहर दादा थोरवे , जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , नगरसेवक राहुल डाळींबकर , भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , ताम्हाणे , सनी चव्हाण , नगरसेवक संकेत भासे , प्रसाद थोरवे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , आदी मान्यवर तसेच आजी माजी महिला , युवा सेना , युवक कार्यकर्ते पदाधिकारी , शिवसैनिक , तसेच बोहरी समाज , नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.