कार्ला (प्रतिनिधी): शिवराजे ग्रुप शिलाटणे (मावळ) आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत छोटया कलाकारांचा प्रचंड प्रतिसाद. बालकलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी तसेच प्रत्येकाच्या दारात महाराष्ट्रा चे कुलदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची प्रतिकृती अजरामर रहावी या हेतूने शिवराजे ग्रुप च्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रुपकडून सांगण्यात आले.
गावातील अनेक बालकलाकारांचा उत्साह व सहभागाने आयोजित किल्ले स्पर्धा मोठया आनंदात संपन्न झाली.या स्पर्धेनिमित्त गावातील सर्व बालकलाकारांनी वेगवेगळे किल्ले तयार करून आपली कला सादर केली. यावेळी शिवराजे ग्रुपच्या वतीने सर्व बालकलाकारांचे कौतुक करत त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवरुपी प्रोत्साहन देण्यात आले.
सदर स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.1) हर्षल भानुसघरे,व ओम साई राज, 2) दिव्या पोटफोडे, 3) सुजल भानुसघरे,व चेतन कोंडभर, 4) यश कोंडभर, 5) ओम भानुसघरे, 6) अथर्व कोंडभर, 7) सक्षम ढाकोळ, व 8) वेदांत कोंडभर अशी सर्व स्पर्धा विजेत्यांची नावे असून शिवराजे ग्रुपच्या वतीने सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.