Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना अल्पसंख्याक महिला कर्जत विधानसभा अध्यक्षपदी जैबुनीसा शेख यांची नियुक्ती..

शिवसेना अल्पसंख्याक महिला कर्जत विधानसभा अध्यक्षपदी जैबुनीसा शेख यांची नियुक्ती..

खोपोली ठाणे जिल्हा एकता मंच रायगड जिल्हाध्यक्ष जैबुनीसा हमीद शेख यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आमदार महेंद्रशेठ थोरवे व शिवसेना खोपोली शहरप्रमुख तथा गटनेते सुनिल पाटील या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत प्रवेश जाहिर केला होता.

जैबुनीसा शेख यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना शिवसेनेत कोणत्या तरी पदावर काम करण्याची संधी पक्षाकडून मिळेल हे नक्की असता 20 सप्टेंबर रोजी त्यांना थेट कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात काम करण्याची संधी शिवसेनेने देत अल्पसंख्याक महिला विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली.

जैबुनीसा शेख यांची मुस्लिम समाजात महिला प्रति खूप आस्था आहे तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांनी निर्माण केलेल्या संस्था व बचतगट त्यांच्या सामाजिक कार्याची पोहचपावती देतात त्यांना दिलेल्या पदाने अनेक मुस्लिम बांधव व महिला शिवसेनेत उघडपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जैबुनीसा शेख यांची शिवसेना अल्पसंख्याक महिला विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती होताच आमदार महेंद्र थोरवे, खोपोली शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते सुनिल पाटील, महिला शिवसेना रायगड जिल्हा संघटक रेखा ठाकरे आदीसह अनेकांनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page