Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांची माथेरान मध्ये आढावा बैठक !

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांची माथेरान मध्ये आढावा बैठक !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी कर्जत नगरीत येत असून त्यांच्या शुभहस्ते कर्जतच्या सौंदर्यात भर घालणारे व ऐतिहासिक वास्तूंचा लोकार्पण सोहळा तसेच ऐतिहासिक सभा पोलीस मैदान कर्जत येथे ठीक ४ – ०० वाजता पार पडणार असल्याने , या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा , असे आमंत्रण घेवून जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर माथेरान येथे पोहचून त्यांनी आढावा बैठक घेतली . यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

अल्पावधीतच कर्जत मतदार संघात करोडो रुपयांचा निधी आणून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ” विकास गंगा ” या मतदार संघात आणली . कर्जत तालुका पर्यटन क्षेत्रात विकसित होत असताना यात भर म्हणून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारणारे प. पू. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , प्रती आळंदी , राजमाता जिजाऊ उद्यान , छत्रपती संभाजी महाराज स्मारक , विविध शासकीय कार्यालये असलेली इमारत , यांचे लोकार्पण व इतर कामांचे भूमिपूजन या निमित्ताने होणार असून राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित राहणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक दिनाचे साक्षीदार व्हा , असे आमंत्रण आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी माथेरानकरांना दिले.

यावेळी या आढावा बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख मा. संतोष शेठ भोईर , शिवसेना सल्लगार गजूभाई वाघेश्वर , संघटक – शिवराम बदे , सह संघटक – सरपंच सुरेश दादा फराट , उपतालुका प्रमुख – मिलिंद विरले , उपतालुका प्रमुख – अंकुश शेळके , जेष्ठ, शिवसैनिक नंदुभाई कोळंबे , शहर युवा सेना संघटक जिब्रान मालदार , माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी , शहर संघटक माजी नगराध्यक्ष मनोज खेड़कर , माथेरान शहर महिला प्रमुख संगीता जांभळे , शहर महिला संपर्क प्रमुख प्रिती कळंबे , जेष्ठ शिवसैनिक शिवाजी शिंदे , प्रकाश सुतार , युवा सेना शहर प्रमुख गौरंग वाघेला व माथेरान नगरपरिषदेचे सर्व शिवसेना पदाधिकारी , महिला आघाडी शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page