Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना देणार विरोधकांना " जशास तसे " उत्तर , जिल्हा प्रमुख संतोष...

शिवसेना देणार विरोधकांना ” जशास तसे ” उत्तर , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर आक्रमक…

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे कार्य बघूनच विरोधकांना झाले शल्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या विकास कार्याने विरोधकांना राजकीय आखाड्यात ” चारी मुंड्या ” चित केल्यानेच सैरभैर झालेले विरोधक कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची बदनामी करण्या पलीकडे त्यांच्याकडे उद्योग नसल्याने पोटात झालेले शल्य ते विधानसभा मतदार संघात कुठेही , कुणाचीही भांडण , मारामारी , इतर घटना घडल्यास त्या घटनेला आमदार साहेबांचा संबंध जोडून नाहक बदनामी विरोधक करत असून हे खालापूर व नेरळच्या घटनेतून समोर आले आहे , म्हणूनच यापुढे शिवसेना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची अशी बदनामी करणाऱ्या विरोधकांना ” जशास तसे ” उत्तर देण्यात येईल , अशी भीष्म गर्जना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी आक्रमक होत केली.
आज शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी कर्जत खालापूर मतदार संघातील सर्व पोलीस ठाण्यात एकाच वेळी निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले , त्यात नेरळ शहरात झालेल्या मारहाण प्रकरणात कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची सोशल मीडियावर व विविध प्रसार माध्यमातून नाहक बदनामी करणारी जी व्हिडिओ व्हायरल करण्यात आली , त्याचा शोध घेवून अशी बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक रायगड यांच्याकडे यावेळी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी नेरळ शहरात एक घटना घडली. यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत असताना दिसत आहे. ही मारहाण त्यांच्या वैयक्तिक वादातुन झाल्याचे समजते. ह्या झालेल्या वादाचा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी कोणताही संबंध नसताना नाहक विरोधकांच्या वतीने आमदार महोदयांची बदनामी केली जात होती . तर गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना खालापूर तालुक्यात घडली होती , त्याही वेळेस पोलीस स्टेशन मध्ये आरोपींवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला , मात्र या घटनेचा देखील विरोधकांच्या वतीने त्या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसताना त्याही वेळेस आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या बाबतीत विरोधकांनी ” घाणेरडा ” अपप्रचार केला.

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधक हे सर्व राजकारण करताना दिसत आहेत . आमदार महोदयांनी या मतदार संघात २ हजार करोड रुपयांची विकास कामे पूर्ण केली असल्याने त्याचबरोबर रोजच मोठ मोठे पक्ष प्रवेश होत असल्याने त्याचे ” शल्य ” त्यांच्या पोटात उठले असून अशी बदनामी करण्याचे विरोधक ” कट कारस्थान ” करत आहेत . यावर जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी प्रकाश टाकत , आमदार साहेबांचा शासनाकडून नेमलेला पोलीस म्हणून अंगरक्षक बॉडीगार्ड असताना विरोधक चुकीची वक्तव्ये करत असून या विरोधात शिवसेना ” जशास तसे ” उत्तर देईल , असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

या घटनेचा जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी तीव्र निषेध कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वतीने व्यक्त केला असून कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार श्री. महेंद्रशेठ थोरवे यांची सोशल मीडियावर अथवा विविध प्रसार माध्यमांवर नाहक बदनामी केल्याबाबत संबंधित व्यक्तींवर आठ दिवसांत शोध लावून त्वरित कायदेशीर करवाई करण्यात यावी , अन्यथा शिवसेना या कृत्याबद्दल तीव्र आंदोलन करेल , अशी मागणी त्यांनी शिवसेनेच्या वतीने कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडे केली .यावेळी सदरच्या निषेध मोर्च्यात कर्जत तालुक्यातील सर्व शिवसेना – युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page