![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगा व – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात शिवसेना या पक्षाची पुन्हा मजबुती उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असून नुकतेच पाशाणे विभागातील युवा उद्योजक सचिन विशे यांनी नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश केला . त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे या विभागात शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे.
” समस्या तिथे नियोजन ” असे सूत्र हाती घेवुन सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत न. प. चे ज्येष्ठ गटनेते नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात नवसंजीवनी आली असून जुने शिवसैनिक पुन्हा ” घर वापसी ” होवून पक्षप्रवेश करत आहेत . पाषाणे गावातील युवा उद्दोजक सचिन विशे यांनी शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीर प्रवेश केला. उपजिल्हाप्रमुख नितीन दादा नंदकुमार सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत या पक्ष प्रवेशाने पाषाणे परिसरात शिवसेना वाढीसाठी त्याचबरोबर शिवसेनेला बळकटी देण्यासाठी या युवा उद्दोजकाचा पक्षप्रवेश महत्वपूर्ण ठरणार आहे.
उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी पाषाणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रकारची मदत आपल्या सर्वांना केली जाईल , असे आश्वासन दिले. युवा उद्दोजक सचिन विशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून कर्जत – खालापूर मतदार संघातील अनेक तरुणांचा वाढता ओघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे दिसून येत आहे. यासाठी नितीन दादा सावंत यांनी पक्ष बांधणीसाठी जातीने लक्ष घातले आहे.
” शिवालय ” येथे झालेल्या पक्ष प्रवेशाला उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे , संघटक बाबू घारे , सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे , युवासेना कर्जत तालुका सचिव अॅड.संपत पांडुरंग हडप , माजी सभापती पंढरीनाथ राऊत , माजी उपतालुका प्रमुख जगन भासे , जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे , उपतालुका संघटक नरेश शेळके , युवासेना उपतालुका अधिकारी ऋशिकेश सोनावळे, किशोर दळवी, जिल्हापरिषद संघटक किशोर पोसाटे , विभाग संघटक संतोष घाडगे, सरपंच आसिम बुबेरे, अजय काळींबे, किरण झांजे, सचिन काळभोर त्याच बरोबर अनेक युवासैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.