if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
सर्वांनी अभिष्टचिंतन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे केले आवाहन..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघातील एक बडे राजकीय प्रस्थ असलेले , जवळ जवळ ३० वर्षे राजकारणात असलेले व सरपंच पद ते विधानसभेची निवडणूक लढलेले मात्र थोड्याफार फरकाने विजयश्री हुकलेले मात्र तरीही न डगमगता आपले राजकीय स्थान अबाधित ठेवणारे , राजकीय क्षितिजावरील चमकणारा तारा , सर्वांना मदतीला धावून जाणारे व कर्जत तालुक्यातील वासरेच्या खोंड्यातील नागरिकांच्या मनात घर करून असलेले तसेच कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू शिलेदार शिवसेनेचे मा. कर्जत – खालापूर विधानसभा संघटक श्री. संतोषशेठ भोईर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मा.श्री.श्रीरंग आप्पा बारणे – खासदार , मावळ लोकसभा ,मा. श्री. भरतशेठ गोगावले, पक्षप्रतोद तथा आमदार महाड , मा.श्री. महेंद्रशेठ दळवी – आमदार अलिबाग , मा. श्री. महेंद्रशेट थोरवे – आमदार कर्जत खालापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि . ७ जुलै २०२३ रोजी रॉयल गार्डन – कर्जत येथे सायं. ५ वाजता निमंत्रक – शिवसेना कर्जत खालापूर व ग्रुप ग्रामपंचायत, शिरसे यांनी आयोजित केला आहे. यानिमत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी रा.जि.प. प्राथमिक शाळा शिरसे तमनाथ येथे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप – सकाळी १० वा. , आरोग्य शिबीर (आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी व चष्मे वाटप, ज्येष्ठांसाठी ) राधामाई मंगल कार्यालय – तमनाथ येथे सकाळी १० – ३० वाजता , वृक्षरोपण तमनाथ येथे सकाळी ११ वा. , तर खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा, सायंकाळी ४ वा. आयोजित केला आहे.
यामध्ये मौजे तमनाथ शंकर मंदिर ते मोहीली या रस्त्याचे बांधकाम – ( जिल्हा नियोजन विभाग ) रक्कम 19.83 लक्ष , प्रजिमा 17 ते तमनाथ कातकरवाडी जोड रस्त्यावरील साकव बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे (अर्थसंकल्प ) 63. 33 लक्ष , शिरसे – तमनाथ – आडिवली रस्ता प्रजिमा 19 कि.मी. 0/00 ते 200 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (अर्थसंकल्प ) रक्कम 278.14 लक्ष , ग्रुप ग्रामपंचायत शिरसे मधील तमनाथ येथे निवारा शेड बांधणे व उल्हास नदी घाट पायऱ्यांचे बांधकाम करणे (खासदार निधी) 10 लक्ष , तमनाथ येथे प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे ( जिल्हा नियोजन विभाग ) 2 लक्ष , मौजे तमनाथ येथे अंगणवाडी दुरुस्ती करणे ( जिल्हा नियोजन विभाग ) 1 लक्ष , ग्रामपंचायत शिरसे हद्दीतील मौजे तमनाथ येथे गणेश घाट बांधणे (2515) 10 लक्ष , ग्रामपंचायत शिरसे हद्दीतील मौजे तमनाथ दलित वस्ती येथे स्मशानभूमी बांधणे (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ) 10 लक्ष , आदी भूमिपूजन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.
तरी विधानसभा मा. संघटक संतोष शेठ भोईर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास व विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे , असे आवाहन शिवसेना कर्जत – खालापूर व ग्रुप ग्रामपंचायत, शिरसे यांनी केले आहे.