Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेनेच्या " मशाल " निशाणीचे जल्लोष्यात स्वागत !

शिवसेनेच्या ” मशाल ” निशाणीचे जल्लोष्यात स्वागत !

उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली निशाणीचे पूजन..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )” शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ” असे नामकरण झालेल्या शिवसेनेला नवीन मिळालेली निवडणूक निशाणी ” मशाल ” या चिन्हाचे कर्जत तालुक्यात उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोष्यात स्वागत व पूजन करण्यात आले.या वेळी उपस्थित शिवसैनिकांचा प्रचंड जल्लोष दिसण्यात आला.आज मंगळवार दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजी १२.०० वाजता शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन निशाणी ” मशाल ” चे पूजन केले.
उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा महिला जिल्हा संघटक सौ. सुवर्णा जोशी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख – हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर कर्जत तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले . कर्जत ता.संपर्कप्रमुख सुदाम पवाळी आणि ता.संघटक बाबू घारे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. विभागप्रमुख अविनाश भासे यांनी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांचे आभार मानले.

याप्रसंगी रायगड उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत, महिला जिल्हा संघटक सौ.सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे, तालुका संपर्क प्रमुख सुदाम पवाळी, महिला तालुका संघटक करुणा बडेकर, तालुका संघटक बाबू घारे, युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, युवासेना कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत हडप, माजी सभापती प्रदीप ठाकरे, नगरसेविका प्राची डेरवणकर,माजी नगरसेवक संतोष पाटील,माजी नगरसेवक कृष्णा घाडगे, रोहिदास मोरे, सुरेश गोमारे, शाखाप्रमुख समीर साळोखे,सुदेश देवघरे,निलेश घरत, शैलेश देशमुख, जगदीश दिसले,प्रशांत दिघे, सुमित चंदन, वैभव दळवी, अक्षय ठाकरे,मयूर कर्णूक , प्रमोद सावंत , प्रमोद खराडे , रवींद्र गजमल , महेंद्र मोरे , मंगेश गजमल , राजा कर्णूक , राहुल इंगळे , सचिन गायकवाड , संतोष शेळके , दिनेश भासे , अविनाश बोराडे , आणि असंख्य शिवसैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page