प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खोपोली: शेतकरी कामगार पक्ष नेहमी जनतेसोबत असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे आणि राहील, असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांनी जनतेला दिले ते खोपोली येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी एक नंबर ला राहिला असून त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला शेतकरी कामगार पक्षाला विचारात घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही.
त्यामुळे शेकाप नेहमी जनतेच्या बाजूने उभा राहिला असून जनतेसाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा देऊन महाविकास आघाडीत सामील झालो आहे, येणाऱ्या काळात शेकापच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन निवडणूकीबाबत कोणाशी आघाडी करायची किंवा युती करायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,यावेळी खोपोलीतील काही कार्यकर्त्यांनी शेकापत प्रवेश केला.
या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, खालापूर तालुका शेकाप चिटणीस संदीप पाटील, खालापूर तालुका पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, खालापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, कैलास गायकवाड, आदींसह अनेक शेकापचे कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.