Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशेलू ग्रामपंचायतीवर आरपीआय पक्षाचा निळा झेंडा फडकला !

शेलू ग्रामपंचायतीवर आरपीआय पक्षाचा निळा झेंडा फडकला !

सौ.विणा विनोद गमरे यांची उपसरपंच पदी निवड , ता.अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी केले अभिनंदन…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायती वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाच्या सौ.वीणाताई विनोद गमरे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली असून त्यामाध्यमातून आरपीआय पक्षाचा निळा झेंडा फडकला आहे.शेलू ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ.विणा विनोद गमरे यांचे अभिनंदन व पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आरपीआय पक्षाचे कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी भेट दिली.त्यानिमित्ताने त्यांनी या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री शिवाजीशेठ खारिक यांचे देखील अभिनंदन केले.
आरपीआय पक्षाची कर्जत ता.अध्यक्ष पदाची धुरा हिरामण भाई गायकवाड यांनी सांभाळल्यापासून पक्षाला नवसंजीवनी प्राप्त झाली असून महिलांचे देखील संघटन त्यांनी मजबूत केले आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन पक्ष मजबूत कसा होईल , याकडे त्यांनी लक्ष दिले असून आगामी येणाऱ्या जि. प.व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढील विविध कार्यक्रम आखत आहेत.
त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत आलेली मरगळ नाहीशी होत असून त्यांचे कार्य यानिमित्ताने उल्लेखनीय दिसत आहे. यावेळी शेलू ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच सौ.विणा विनोद गमरे यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या समवेत ता. सचिव – अनंता खंडागळे , उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड , नेरळ शहर अध्यक्ष दिनेश आढाव , सहसचिव – जिवक गायकवाड , निखिल गायकवाड , जेष्ठ सल्लागार – सुभाष पवार , दामत पंचायत समिती उपाध्यक्ष – अशोक गायकवाड , दामत पंचायत समिती अध्यक्ष – रविंद्र गायकवाड , विनोद गमरे , कर्जत तालुका महिला अध्यक्षा – अलका सोनावणे , उपाध्यक्ष वर्षा चिकणे , सचिव – उज्वला सोनावणे , वर्षा गायकवाड , नेरळ शहर अध्यक्षा – सुरेखा कांबळे , सुनिता चव्हाण , वंदना गायकवाड , सीमा गमरे , प्रभावती जाधव , सुमन गायकवाड , सुनिता पगारे , मंगल गमरे , नंदा सोनावणे , स्वाती जाधव , मेघा जाधव , जितेश गमरे , यशवंत गायकवाड , आदी असंख्य आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे उपस्थितीत अभिनंदन – सत्कार – शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page