Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडश्रावण महिन्यात रक्षाबंधन विशेष महत्व..

श्रावण महिन्यात रक्षाबंधन विशेष महत्व..

रायगड: स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते.

व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.

लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.

बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते.बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपनी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.

दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.

- Advertisment -

You cannot copy content of this page