लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोणावळा व मावळ तालुका जेष्ठ नागरीक संघ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व लोकमान्य हॉस्पीटल चिंचवडच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरात जवळजवळ दोनशे नागरिकांनी आपल्या सर्व व्याधीवर डॉक्टरी सल्ला व उपचार करून सर्व रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळ हॉल भांगरवाडी येथे करण्यात आले होते.
यामध्ये हाडांचे आजार, हृदयांचे आजार, अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ( PTCA ( CABG ), यावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याची माहिती श्रीधर पुजारी यांनी दिली.
श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शहरातील जेष्ठ नागरिक, महिला अशा एकूण दोनशे जणांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे. तसेच श्रीधर पुजारी यांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबविला असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या वेळी श्रीधर पुजारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्या या अप्रतिम उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी मा. आमदार संजय बाळा भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश भेगडे, जितेंद्र बोत्रे इत्यादी मान्यवरांच्या समवेत लोणावळा शहरातील अनेक भाजपा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या आणि रुग्ण मोठया संख्येने उपस्थित होते.